***
अखेर देह संपला क्षणात गार जाहला
मनातला विचार ही सवेच ठार जाहला
दिसेल नेहमी तुला नव्या नव्या रुपात मी
जुन्याजुन्यात गुंतणे जुना प्रकार जाहला
किती सखे कट्यारिला जहाल धार लाव तू
हृदय असे द्रवार्द्र की जलात वार जाहला
तुला नसे अजूनही कठीण मारणे मला
तुझा कटाक्ष एकला क्षणैक फार जाहला
जिवंत जाळण्या मला कशास आग पाहिजे
घरात बेबनावही इथे चिकार जाहला
- अभिजीत काळे.
अखेर देह संपला क्षणात गार जाहला
मनातला विचार ही सवेच ठार जाहला
दिसेल नेहमी तुला नव्या नव्या रुपात मी
जुन्याजुन्यात गुंतणे जुना प्रकार जाहला
किती सखे कट्यारिला जहाल धार लाव तू
हृदय असे द्रवार्द्र की जलात वार जाहला
तुला नसे अजूनही कठीण मारणे मला
तुझा कटाक्ष एकला क्षणैक फार जाहला
जिवंत जाळण्या मला कशास आग पाहिजे
घरात बेबनावही इथे चिकार जाहला
- अभिजीत काळे.
No comments:
Post a Comment