तुला मी आठवावे का कशाला काय कारण?
दिले नाही परत तू घेतलेले प्रेम तारण.
कधी नेता, कधी योगी, कधी तू ब्रम्हचारी,
इरादे काय नक्की, का उगा हे रूप धारण ?
जमव गोतावळा भवती किती म्हण भक्त त्यांना,
मला तर वाटती स्वार्थीच सारे भाट चारण.
कशाचा कायदा, येथे कशाचा न्याय होतो?
बळी तो कान पिळतो, दुःख ना होते निवारण.
तुझ्या हातातला ना गोडवा आई कशाला,
असावे वाटते घासामधे वात्सल्य सारण !
- अभिजीत काळे.
१७ ऑगस्ट २०१७.
No comments:
Post a Comment