***
नसणार घास त्यांच्या ताटात आज नक्की.
गळणार दोन अश्रू दुःखात आज नक्की.
मन शांत झोपलेले नसते कधी कुणाचे.
पण निर्विचार व्हावे स्वप्नात आज नक्की.
शब्दांत झिरपल्यावर मादक नशा गझलची,
झिंगेन मी सुखाने झोकात आज नक्की.
डोळ्यांत आसवांनी केला बनाव आहे.
फसवा तणाव दिसतो प्रेमात आज नक्की.
माझ्या तुझ्यात बोलत बसलाय जो अबोला?
त्याचा करू खुलासा मौनात आज नक्की.
माझ्या पराभवाचा अंदाज लावल्यावर,
पडलेत तर्क त्यांचे पेचात आज नक्की.
अभिजीत का मनाचा करतोस लाड इतका?
(बालक तुझ्या मनाचे हट्टी बरेच आहे)
ठेवील कोण त्याला धाकात आज नक्की!
- अभिजीत काळे.
२७ नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment