*कस्तुरी*
प्रिया यौवनाच्या फुलोऱ्यात आली.
सुगंधी नशा बंधपाशात आली.
सुचेनाच काही तिच्यावाचुनी मज....
नयन झाकले तोच स्वप्नात आली.
अशी लाजुनी लाल गाली जहाली?
सखीच्या सवे सांज रंगात आली.
सुगंधी फुलांची जणू अत्तरे की !
हवेचे झुले घेत श्वासात आली.
मनाच्या नभाचे निळे मेघ झरता
तुझी कस्तुरी चिंब स्पर्शात आली.
- अभिजीत काळे.
२ ऑक्टोबर २०१७.
No comments:
Post a Comment