Wednesday, 27 May 2020

रस्त्यावरती

... रस्त्यावरती

गर्दी मोठी जमली होती... रस्त्यावरती
पण माणुसकी हरली होती... रस्त्यावरती

धुंदीमध्ये ज्यांच्या गाडी... उधळत होता 
स्वप्ने ती विरघळली होती...  रस्त्यावरती

घर शोधाया जमले नाही... ज्या वेड्यांना  
आयुष्ये ती सडली होती...  रस्त्यावरती

पळती दोघे संसाराची... गाडी ओढत
गुरुकिल्ली सापडली होती... रस्त्यावरती

घामाने मी सिंचन केले शेताचे अन्
ताजी भाजी पडली होती रस्त्यावरती

                    - अभिजीत काळे.
                    १२ डिसेंबर २०१७.

No comments:

Post a Comment