Wednesday, 27 May 2020

ज्ञानज्योती

सुप्त गाभाऱ्यात बुद्धी काजळीने व्याप्त होती
विझविला अंधार सारा लावुनी मी ज्ञानज्योती

शांत केले आसवांनी पोळणाऱ्या खदखदीला 
यज्ञ केला लोचनांनी अर्पुनी एकेक मोती

पोचला आवाज होता खूप उशिरा हाय तेथे 
झोपडी माझी जळाली, उंच त्या वाड्यांस जोती

काल ज्यांना मान होता आज कोठे राहिले ते?
जाळली गेली नदीवर स्वार्थ भरली सर्व पोती

फक्त स्पर्शाने अहिल्या उद्धरावी राघवाच्या,
मानती खोटे तयांची वाटते बुद्धीच कोती!

                              - अभिजीत काळे.
                              ४ नोव्हेंबर २०१७.

No comments:

Post a Comment