***
आमची आम्हीच रेषा आखलेली, आमची आम्हीच रेषा खोडलेली.
ती पुरेशी स्पष्टही नाहीच आता अन् कुणीही पूर्ण नाही मिटवलेली.
मार्ग जातो दूर तेथे, संशयाचे का धुके आहे फिरंगी साठलेले?
कोणत्या शिखरा करू मी आपुलेसे, जर धुक्याने सर्व शिखरे वेढलेली?
भावनांचे घोळ सारे, त्यात बुद्धी तर्कवादी, कोणते अनुमान काढू?
नेणत्यांच्या दंगलींना जाणत्यांच्या बेदिलीची फूस मोठी लाभलेली.
जाळते संदर्भ सारे शांततेचे बेधडक जी, कोठुनी येते हवा ती?
कोणत्या बुद्धी प्रमेयांनी फुटीची मतलबीची बीजगणिते मांडलेली?
आपुले म्हणणे खरे हे दावण्याला पातळी सोडून देते भ्रष्ट बुद्धी
खोडण्या इतिहास इथल्या वैभवाचा, खेकड्यांची कोण स्पर्धा लागलेली
- अभिजीत काळे
१२ मार्च २०१९.
No comments:
Post a Comment