भावना सांगते काय आहे ?
अंतरी चालते काय आहे ?
काळजी रात्रभर जागणारी,
जागता शोधते काय आहे?
'मी' पणा वाढता त्यास वाटे
मज पुढे विश्व ते काय आहे?
रोखुनी पाहते ती अशी की
मन्मथा तोलते! काय आहे?
देश असला जरी लोकशाही
भ्रष्टता बोलते काय आहे?
कालचा फाटका माजला का?
वेळ सोकावते काय आहे?
भक्त का वाढले रावणाचे?
वागणे योग्य ते काय आहे?
चोचले वाढले माणसाचे
जीवना लागते काय आहे?
पापणी झाकता झोपतो मी,
यापरी सौख्य ते काय आहे?
. . . . अभिजीत काळे.
७ ऑक्टोबर २०१७.
No comments:
Post a Comment