Wednesday, 27 May 2020

तृषा

तृषा

सुखे शोधता दुःख येते थव्याने, 
तृषा भागते का कधी मृगजळाने?

नको मोहरू तू जराशा दवाने,
उभा जन्म जळणार आहे उन्हाने.

'हवा' शुद्ध 'पाणी', तुझी  मागणी ही!
अशी वेळ आली तुझ्या वागण्याने?

नको शोध घेऊ नव्या तू ग्रहाचा,
पुरे बाटलेली धरा प्रदुषणाने.

धुराळा मनाच्या तळाशी किती हा?
कशी स्वच्छ व्हावी इथे तावदाने?

नदीची मनीषा असे वाहण्याची,
नभी मूर्त व्हावे जरा सागराने!

कधी बोलला वा कुणाला न दिसला!
जरा �साद द्यावी अता ईश्वराने!

                   -अभिजीत काळे.
                  ५ ऑक्टोबर २०१७.

No comments:

Post a Comment