***
दोन बिंदू जोडण्या झुलतोय हिंदोळा.
जीवनाला एक झोका म्हणतोय हिंदोळा.
रंगभरल्या वास्तवाचे सत्य शोधाया,
पांढर्या काळ्यामधे हलतोय हिंदोळा.
पाकळ्या गळता फुलाला खेद ना काही,
बीज ते फळ पूर्णता करतोय हिंदोळा.
वेळ येते, काळ जातो, चक्र अव्याहत,
वर्तमानाला कुठे कळतोय हिंदोळा.
एकदा पाहून जा दुर्भाग्य माझे तू.
आजही येथे रिता सलतोय हिंदोळा.
राहिली आहे उधारी भूतकाळाची.
फेडण्याला वाट हा बघतोय हिंदोळा.
झाकुनी डोळे तुम्ही चालालही लेको,
जन्म मृत्यूचा कुठे टळतोय हिंदोळा.
- अभिजीत काळे.
२५ मार्च २०१९.
No comments:
Post a Comment