Wednesday, 27 May 2020

अजून थोडी




नशा चढेना दुःख सरेना प्यावी वाटे अजून थोडी 
बेफिकिरीने मजा गझलची घ्यावी वाटे अजून थोडी


शब्द संपले श्वासांमधले संभाषण पण चालू आहे
मौनामध्ये अबोल बोली ध्यावी वाटे अजून थोडी


वाटत आलो सुखदुःखांना जन्मोजन्मी आनंदाने 
लुटून अवघी शब्द संपदा द्यावी वाटे अजून थोडी


बेहोषीचे अत्तर करते दूर मनाला मनापासुनी
अंतस्थाच्या समीप होडी न्यावी वाटे अजून थोडी


नकळत कळले कळता कळता कुठे हरवलो होतो आपण
कळलेल्याची जाणिव आता  यावी वाटे अजून थोडी

                    - अभिजीत काळे.
                  ४ ऑक्टोबर २०१७.

No comments:

Post a Comment