रत्न सोने माणिकांची हौस करते चांदणी
अनुभवांच्या पुस्तकांना दाविल्या तू वळचणी
माणसांना वेळ होता अन घरांना अंगणे
लांबुनी बघते अताशा बाल्कनी ती देखणी
पाव पिझ्झा केक पास्ता लाट आली इंग्रजी
भाकरीच्या आठवांनी गहिवरे पण नाचणी
ओळखीचे मित्र आता मोजतो बोटावरी
मित्रसंख्येचा फुगा हातातली ई-खेळणी
बातम्या नंतर करा पण हात द्या आधी मला
आपदेने ग्रस्त त्याची हीच पहिली मागणी
. . . . . . अभिजीत काळे
१७ ऑक्टोबर २०१७.
No comments:
Post a Comment