***
मी ढगांना परतताना पाहिले.
अन् उन्हाला बरसताना पाहिले.
'माणसाचे संपले माणूसपण',
बेरक्यांना बोलताना पाहिले.
कोवळे दिसते निरागस वय तुझे,
त्या उलट तू वागताना पाहिले.
हे तुझे आकाश सरडा वाटते
रंग त्याचे बदलताना पाहिले.
पिंजरे रंगीत, मोहक सापळे
पाखरू भंजाळताना पाहिले.
पाडवा, दसरा, दिवाळी, होलिका
वर्ष नकळत संपताना पाहिले.
सार्या ऋतूंचे सोहळे
झाडभर मोहोरताना पाहिले.
- अभिजीत काळे.
२७ ऑगस्ट २०१९.
No comments:
Post a Comment