***
मी आरशात जेव्हा बसतो उगाच पाहत,
अंतर्मनात असतो तेव्हा मलाच पाहत.
परदुःख ज्यास कळते माणूस तो म्हणावा,
संस्कारशून्य प्राणी बसतो मजाच पाहत.
हो वाहतेय गंगा होतो विकास आहे.
काठावरी उभा पण गरजू रिताच पाहत.
काळासवे उजळती विझती दिशा दहाही.
तो येत जात नाही आत्मा उभाच पाहत.
तू नेहमीप्रमाणे दिसतेस स्टॉपवर अन्,
तो नेहमीप्रमाणे थिजतो तुलाच पाहत.
बुडतो अनेकवेळा उसळून येत वरती.
लाटांवरील माझ्या प्रतिमा असाच पाहत.
दुष्काळ वा सुबत्ता होवो स्थिती कशीही.
स्थितप्रज्ञ काळ झाला घटना अश्याच पाहत.
~ अभिजीत काळे.
No comments:
Post a Comment