***
ऐकवून मी कथा तुला बर्याच आतल्या
वाढवून ठेवल्या व्यथा उगाच आतल्या
संपले म्हणू कसे उठाव या मनातले
सोडतात त्या कुठे? खुणा तश्याच आतल्या
बोलणे नकोच ते मनात काय चालले
सांगती कळा खरे तुझ्या तुलाच आतल्या
दाबलेस दुःख तू पुरून भावना मनी
तोडल्यास कोवळ्या मुक्या कळ्याच आतल्या
गर्व वाटला मनी अहंपणा सुखावला
माकडास भावती मुढा उड्याच आतल्या
आर्जवीत राहिली तुला तुझी विषण्णता
राख होत संपल्या पिढ्या तुझ्याच आतल्या
पोसलेस काल ज्या पिलांस द्वेष चारुनी
आज दंशतात ती, चुका खर्याच आतल्या?
~ अभिजीत काळे.
No comments:
Post a Comment